छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): आळंदी येथे प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीला तिच्याच नातेवाइकांनी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले असून, तिच्या जिवाला धोका असल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. याप्रकरणी पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत न्याय मागितला आहे. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांनी याचिकाकर्त्याच्या पत्नीच्या जीविताला कोणतीही बाधा पोचणार नाही, असे स्पष्ट लेखी
HIGH COURT
हमीपत्र प्रतिवादी नातेवाइकांकडून कोर्टात नोंदवून घेतले आहे.
संबंधित युवक आणि युवतीने ४ मे २०२६ रोजी आळंदी येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर दोघेही १० मे रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात संरक्षणासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी
त्यांना संरक्षण दिले नाही. त्यामुळे पत्नीच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा करीत पतीने अॅड. गणेश कोरे आणि अॅड. ओमप्रकाश वाघमारे यांच्यामार्फत याचिका दाखल केली.
या याचिकेत पतीने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत पत्नीच्या जीवितास धोका असल्याचा आरोप केला. पोलिस ठाण्याबाहेर युवतीच्या नातेवाइकांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर लातूर पोलिसांनी युवतीला जबरदस्तीने नेल्याचा आरोप करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions









